Home Cities जळगाव मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चिमुकल्यांनी साकारली श्रीकृष्णाच्या विविध बाललीलांची सजीव आरास

मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चिमुकल्यांनी साकारली श्रीकृष्णाच्या विविध बाललीलांची सजीव आरास

0
8


रायपूर ता. जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रायपूर येथील मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘गोविंदा आला रे’ या विशेष कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या विविध बाललीलांची सजीव आरास सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषा, नृत्य आणि दहीहंडीमुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी वासुदेव, बालकृष्ण, बलराम, माता देवकी, माता यशोदा, राधा आणि रुक्मिणी या पात्रांच्या आकर्षक वेशभूषा परिधान केल्या होत्या. चिमुकल्यांनी साकारलेल्या या विविध रूपांमुळे श्रीकृष्णाच्या बाललीलांचा प्रसंग जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रिंगण करून ‘मच गया शोर सारी नगरी रे…’ या गीतावर उत्स्फूर्त नृत्य सादर केले. चिमुकल्यांच्या या धमाल नृत्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दहीहंडीचा आनंद घेत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला. श्रीकृष्ण जन्माष्टमीसारख्या सांस्कृतिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, परंपरा आणि पौराणिक कथांची ओळख होते. तसेच विविध पात्रांच्या वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमासाठी सौ. भारती परदेशी मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी सोनाली देसले, मयुरी वाघ, शिवानी पाटील आणि चंचल वानखडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound