Home धर्म-समाज मुक्ताईनगरमध्ये चिमुकल्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती 

मुक्ताईनगरमध्ये चिमुकल्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती 

0
46


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भाद्रपद महिन्याच्या आगमनासोबतच घरोघरी गणरायाच्या आगमनाची उत्सुकता वाढली असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर येथील सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याच्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती आपुलकी निर्माण व्हावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची सवय लागावी, या हेतूने हे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेदरम्यान प्रशिक्षक श्रीमती प्रणिता चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीचा वापर करून सुबक व आकर्षक गणपती मूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी दिलेल्या सहज आणि सोप्या मार्गदर्शनाचा वापर करत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने व कल्पकतेने स्वतःच्या हाताने गणपतीच्या विलोभनीय मूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांमुळे शाळा परिसरात आनंददायी व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

या कौतुकास्पद कार्यक्रमाचे आयोजन  निलेश कळसकर सर यांनी केले होते, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदाचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची माहिती मिळताच शाळेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे-खेवलकर, नारायण नामदेव चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, स्कूल कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम महाजन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची पाहणी करून त्यांचे मनापासून कौतुक केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.


Protected Content

Play sound