Home क्राईम चाळीसगावच्या ऑट्रम घाटात एसटी बसचा भीषण अपघात ! ५९ प्रवाशांचा जीव टांगणीला,...

चाळीसगावच्या ऑट्रम घाटात एसटी बसचा भीषण अपघात ! ५९ प्रवाशांचा जीव टांगणीला, दरीच्या तोंडावर झाड बनले देवदूत

0
15


चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निसर्गरम्य मात्र तितक्याच धोकादायक ऑट्रम घाटात एसटी बसचा अत्यंत थरारक अपघात घडला आहे. संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या या एसटी बसचे वळणावर अचानक नियंत्रण सुटल्याने ती थेट दरीच्या दिशेने वेगाने गेली. मात्र, दरीच्या टोकावर असलेल्या एका भक्कम झाडाला बस आदळल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात झाडाने ढाल बनून बसला दरीत कोसळण्यापासून अडवल्यामुळे ५९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, संभाजीनगर डेपोची एसटी बस प्रवासी घेऊन सुरतकडे जात असताना ऑट्रम घाटातील एका तीव्र वळणावर अचानक गाडीचा स्टीअरिंग रॉड तुटला. यामुळे वाहनावरील स्टीअरिंग पूर्णपणे जाम झाले आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली बस भरधाव वेगात दरीच्या दिशेने धावली आणि रस्त्याचा कठडा तोडून थेट झाडावर जाऊन आदळली. अपघाताच्या वेळी बसमध्ये एक ५९ प्रवासी प्रवास करत होते. अचानक झालेल्या या थरारामुळे प्रवाशांमध्ये मोठा आक्रोश आणि घबराट पसरली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, इतर वाहनचालक आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. बस दरीच्या अगदी टोकावर अडकलेली असल्याने अत्यंत काळजीपूर्वक सर्व ५९ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या भीषण प्रसंगात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound