Home Cities जळगाव जळगावात २९ ऑगस्टला गौतम खट्टर यांचे ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ व्याख्यान ; नागरिकांना उपस्थितीचे...

जळगावात २९ ऑगस्टला गौतम खट्टर यांचे ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ व्याख्यान ; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त जळगावात ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ या विषयावर जाज्वल्यपूर्ण व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतभर प्रसिद्ध असलेले प्रखर आणि ओजस्वी वक्ते गौतम खट्टर या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार असून, राष्ट्रप्रेम, इतिहास आणि श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचा जागर या माध्यमातून करण्यात येणार आहे.

हा भव्य कार्यक्रम शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जाज्वल्य इतिहासाची आणि त्यांच्या अफाट पराक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन बहुभाषिक ब्राह्मण संघ यांच्या वतीने करण्यात आले असून, आमदार राजूमामा भोळे, अग्रवाल नवयुवक मंडळ, श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ-जळगाव, मल्हार सेना, महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, नवीपेठ मित्र मंडळ आणि सुभाष चौक मित्र मंडळ हे सहआयोजक आहेत. विशेष म्हणजे हे व्याख्यान सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांसाठी खुले असून, कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही पासची आवश्यकता नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जळगाव शहरासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेचा इतिहास जाणून घेण्याची संधी या व्याख्यानातून मिळणार आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी नागरिक, तरुणाई आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जळगावात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘राष्ट्रहित सर्वोपरी’ व्याख्यानातून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचा इतिहास आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गौतम खट्टर यांच्या ओजस्वी मार्गदर्शनामुळे या कार्यक्रमाकडे इतिहासप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound