यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा फैजपूर नगरपालिकेचे नगरसेवक हाजी अन्वर खाटीक यांची रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार तसेच आमदार एकनाथ खडसे, माजी खासदार ईश्वर जैन, आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा नेते रवींद्र भैय्या पाटील, श्रीराम पाटील आणि माजी आमदार संतोष चौधरी यांच्या सहकार्याने ही नियुक्ती करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने हाजी अन्वर खाटीक यांची रावेर लोकसभा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर प्रदेशाध्यक्ष विशाल वाकोडकर, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष अफजल फारुकी, अल्पसंख्याक प्रदेश कार्याध्यक्ष वारिस खान, जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, हाजी याहया सैय्यद यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
हाजी अन्वर खाटीक यांच्या नियुक्तीमुळे रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षाची भूमिका आणि विचारधारा तळागाळातील कार्यकर्ते व जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.



