Home क्राईम मुक्ताईनगर तालुका हादरला : चाकूने वार करून युवकाचा खून !

मुक्ताईनगर तालुका हादरला : चाकूने वार करून युवकाचा खून !

0
3

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बेलसवाडी गावात धक्कादायक घटना घडली असून, 19 वर्षीय अबुजर रफीक शेख याचा चाकूने वार करत खून करण्यात आला असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडील माहितीनुसार, दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 8.45 वाजता बेलसवाडी गावातील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर ही घटना घडली. मागील भांडणाच्या कारणावरून गावातील एका सतरा वर्षाच्या युवकाने याने अबुजर रफीक शेख याच्या छातीत चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या गंभीर हल्ल्यात अबुजर याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणी डीवायएसपी नंदराज पाटील आणि पोलीस निरिक्षक आशीष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोहेकॉ. निलेश गोसावी यांच्याकडे सोपविण्यात आला असून, मुक्ताईनगर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनाक्रमाचा तपास करत आहेत.

घटनेमुळे बेलसवाडी परिसरात खळबळ उडाली असून, तरुणाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound