Home Cities पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी हर्षल पाटील यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी हर्षल पाटील यांची नियुक्ती

0
22

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीला वेग देण्यासाठी महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. भडगाव तालुक्यातील कनाशी येथील युवा नेतृत्व हर्षल संजय पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मान्यतेने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असून, आगामी काळात मतदारसंघात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्या मान्यतेने हर्षल पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. हर्षल पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भडगाव तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. तालुक्यात पक्षाच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी पक्षवाढीसाठी काम केले आहे. त्यांच्या याच संघटनात्मक अनुभवाचा विचार करून पक्षाने आता त्यांच्यावर संपूर्ण पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम करताना मतदारसंघातील पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे, बूथस्तरापर्यंत पक्षाची यंत्रणा मजबूत करणे तसेच युवक आणि नव्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या प्रवाहात आणणे, यावर हर्षल पाटील यांचा भर राहणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नियुक्तीनंतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून हर्षल पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा विश्वास उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, महिला कार्याध्यक्षा लता राठोड, उत्तर महाराष्ट्र युवती प्रमुख अभिलाषा रोकडे, युवती जिल्हाध्यक्षा मोनिका पवार, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, शहराध्यक्ष कुशल देशमुख, विद्यार्थी कार्याध्यक्ष अजहर शेख, खुशाल मोरे, सागर घुगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound