Home क्राईम हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा ! एकाच दिवसात दुसरा बळी, भरधाव ट्रॉलाच्या धडकेत...

हायवे ठरतोय मृत्यूचा सापळा ! एकाच दिवसात दुसरा बळी, भरधाव ट्रॉलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील महिलेच्या अपघातामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच नशिराबाद टोल नाक्याजवळ झालेल्या अपघातात तरूणाचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

नशिराबाद परिसरातील टोलनाक्याजवळ बुधवारी झालेल्या भीषण रस्ते अपघात 29 वर्षीय मजुराचा जागीच मृत्यू झाला. मृताचे नाव सोनू रामा बागले (29, रा. भवानी नगर, नशिराबाद) असे आहे. प्राप्त माहितीनुसार, सोनू बागले साकेगाव येथे दिवसभर मजुरी करून पिकअप वाहनाने घरी परतत होता. टोलनाक्याजवळ पोहोचताच मागून येणाऱ्या भरधाव ट्रॉलाने पिकअपला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जबरदस्त होती की सोनू पिकअपमधून उडून रस्त्यावर पडला आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने त्याला चिरडले असून यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सोनू बागले हा बांधकाम कामगार असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मोठ्या संख्येने नागरिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले. संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

आज राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात दोन जणांचा बळी गेल्याने सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या अपघातानंतर नागरिकांनी अवजड वाहनांच्या भरधाव वेगावर नियंत्रण ठेवण्याची आणि टोलनाक्याजवळ रस्ता सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तर या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound