फैजपूर ता. यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “शासनाच्या लोकाभिमुख कार्यक्रमांची परिणामकारक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे,” असे आवाहन रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी केले. फैजपूर येथे गुरुवारी, ३० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त ते बोलत होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल २९०० लाभार्थ्यांना ४३५० विविध शासकीय लाभांचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख व जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने रावेर विधानसभा मतदारसंघाचे हे भव्य महसूल समाधान शिबिर फैजपूर येथील शुभदिव्य कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार अमोल जावळे होते. जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचे आमदार नंदकिशोर महाजन यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उपविभागीय अधिकारी, फैजपूर भागाचे बबन काकडे, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, रावेरच्या तहसीलदार दीपा जेधे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी व विभागप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या विविध शासकीय कामांना गती मिळावी आणि एकाच ठिकाणी अनेक योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, शिक्षण, आरोग्य, पंचायत राज, महिला व बालविकास, रोजगार हमी, बँकिंग, विधी सेवा प्राधिकरण आदी १७ शासकीय विभागांचे २० माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. विविध योजनांची माहिती देणारे बॅनर, फ्लेक्स, माहितीपत्रके तसेच प्रत्यक्ष मार्गदर्शनाची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये न जाता एकाच ठिकाणी आवश्यक सेवा व माहिती मिळाली.
या शिबिरामध्ये विविध विभागांच्या माध्यमातून प्रमाणपत्रे, मंजुरी आदेश, लाभवितरण, महसूलविषयक सेवा तसेच अन्य आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात आली. शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यासोबतच नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरातील विशेष उपक्रमांतर्गत मौजे रोजोदा येथील गरजू बेघर लाभार्थी व पात्र शेतकरी कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार १,५०० व ३,००० चौरस फूट भूखंडांचे वितरण करण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्काशी संबंधित ७/१२ उतारे वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळण्याचा मार्ग सुकर झाला. विविध योजनांतर्गत महिलांना शेतकरी दर्जा देणारी प्रमाणपत्रे, लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सातबारा वाटप, कुंभार समाजातील लाभार्थ्यांना ओळख प्रमाणपत्रे, कौटुंबिक वाटणी नोंदणी फी माफीची प्रकरणे, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग कल्याण योजना आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ वितरित करण्यात आले.
तसेच महसूल विभागाच्या विविध सेवा, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेंतर्गत ७/१२ वाटप आणि बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेसह इतर शासकीय विभागांच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांना देण्यात आला. या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या योजना समजून घेण्याबरोबरच त्यांचा प्रत्यक्ष लाभ घेण्याची संधी मिळाली. यावेळी आमदार नंदकिशोर महाजन यांनी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा उल्लेख केला. “महसूल मंत्री महोदयांनी या दिवसांत शेतकऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या तीन ते चार योजना अमलात आणल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना त्याचा निश्चितच फायदा होत आहे,” असे त्यांनी सांगितले.
या जनकल्याणकारी अभियानास फैजपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दामिनी सराफ, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बांधव तसेच विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांनी विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी फैजपूर बबन काकडे यांनी केले. शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांचा समन्वय साधून नागरिकांना एकाच छताखाली सेवा उपलब्ध करून देण्यामागील उद्देश त्यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाचे आभार यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. आर. आर. राजपूत यांनी केले. शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एकाच ठिकाणी अनेक विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत झाल्याचे सांगत नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले.
शासन आपल्या दारी – सेवा आपल्या हक्काची या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या महसूल समाधान शिबिरातून २९०० नागरिकांना ४३५० प्रत्यक्ष लाभ मिळाले. त्यामुळे यावल-रावेर परिसरातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविणारा हा उपक्रम प्रभावी ठरला.
या जनकल्याणकारी अभियानास फैजपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दामिनी सराफ, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विविध सेवा स्टॉलना भेट देऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी फैजपूर बबन काकडे यांनी केले. त्यांनी शिबिराचे उद्दिष्ट, विविध विभागांचा समन्वय आणि नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यामागील संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. आर. आर. राजपूत यांनी केले. शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एकाच ठिकाणी अनेक विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत झाल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. शासन आणि जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे कौतुक केले.



