अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व लोकनेते स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेर यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच महाविद्यालयांना स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेच्या आकर्षक फोटो फ्रेम भेट देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने सन २०२६ पासून दरवर्षी २२ जुलै रोजी स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयांमध्ये स्व. अजितदादा पवार यांची प्रतिमा उपलब्ध व्हावी आणि त्यांची जयंती सन्मानपूर्वक साजरी करता यावी, या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष मनीष पाटील, तालुकाध्यक्ष प्रणव चौधरी आणि कार्याध्यक्ष हुजैफा पठाण यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि विकासाभिमुख विचारांना अभिवादन केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत युवकांनी समाजकारण आणि लोकसेवेत सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच त्यांचा विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनील शिंपी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश पाटील, शहर कार्याध्यक्ष भूषण लोहार, उपाध्यक्ष चैतन्य संदानशिव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष कृष्णा पाटील, राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष करण साळुंखे, सोशल मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानदीप सांगोरे, तालुकाध्यक्ष प्रणव चौधरी, शहराध्यक्ष मनीष पाटील, कार्याध्यक्ष हुजैफा पठाण, सोशल मीडिया शहराध्यक्ष रोहित सूर्यवंशी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोषाध्यक्ष कुशल पाटील, विद्यार्थी सहसचिव चेतन बोरसे, सरचिटणीस तुषार ठाकरे, युवक उपाध्यक्ष वरद कासार, युवक उपाध्यक्ष मोहित शिंदे, युवक चिटणीस विवेक निकम, युवक चिटणीस प्रशांत महाजन, युवक सरचिटणीस अभय महाजन, आदित्य संदानशिव, यश पवार, योगेश पाटील, अनिकेत पाटील, हितेश महाजन, चिन्मय पाटील, उमेश पाटील, भविष्य देशमुख, सुमित मेडिस्कर, प्रशांत चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आवश्यक प्रतिमा उपलब्ध होण्यास मदत झाली असून, शासनाच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने पुढाकार घेतल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



