फेकरी -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फेकरी गावात नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली, तंदुरुस्ती आणि सर्वांगीण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘प्रिमियम वेलनेस सेंटर’चा शुभारंभ उत्साहात पार पडला. सरदार वल्लभभाई पटेल सार्वजनिक सभागृह, संविधान नगर येथे सुरू करण्यात आलेल्या या केंद्राला विशेषतः महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण भागात आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रिमियम वेलनेस सेंटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना शारीरिक तंदुरुस्ती, वजन नियंत्रण, जीवनशैलीतील सकारात्मक बदल, योग प्रशिक्षण, आरोग्य सल्ला, पोषणविषयक मार्गदर्शन तसेच विविध आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक गरजा आणि आरोग्य स्थिती लक्षात घेऊन प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती सेंटरचे वेलनेस कोच कल्याणी गणेश वाघोदे आणि गणेश वाघोदे यांनी दिली. ग्रामीण भागात अशा प्रकारचे आधुनिक वेलनेस सेंटर सुरू होणे ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे सांगत, यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढेल, नियमित व्यायामाची सवय लागेल आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यास चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सेंटरच्या माध्यमातून नागरिकांसाठी मोफत शरीर तपासणी (Body Analysis) ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. विशेषतः महिलांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविल्याने या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. यावेळी प्रिमियम वेलनेस सेंटरसाठी सरदार वल्लभभाई पटेल सार्वजनिक सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल फेकरी गावच्या सरपंच चेतनाताई भिरूड तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय भिरूड यांचे वेलनेस सेंटरच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.



