Home Cities भडगाव भाजपा भडगाव युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर

भाजपा भडगाव युवा मोर्चाची नवी कार्यकारिणी जाहीर

0
8


भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यातील भडगाव मंडळ युवा मोर्चाची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. पक्ष संघटन अधिक बळकट करणे, युवा कार्यकर्त्यांना नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या निवडीसाठी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराव महाडीक, मुख्यालय प्रभारी रवीजी अनासपुरे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वीरेंद्रसिंग राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले. तालुकाध्यक्ष विनोद नेरकर यांच्या मान्यतेनुसार मंडळ अध्यक्ष चेतन रंगनाथ पाटील यांनी कार्यकारिणी जाहीर केली.

नवीन कार्यकारिणीत चेतन रंगनाथ पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली असून योगेश शांताराम शेलार यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी बाळासाहेब बोरसे, मुरलीधर भिल्ल, रामदास महाजन, ज्ञानदीप कासार, संदीप पाटील आणि यशवंत पाटील यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी प्रविण पाटील, विवेक पवार आणि दिपक हटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून चिटणीसपदी देवेंद्र पाटील, अमोल सोनार, सागर पाटील, महेश पाटील, ओंकारसिंग परदेशी आणि भावेश भोसले यांना संधी देण्यात आली आहे. ऋषभ राजेंद्र पाटील यांची कोषाध्यक्ष तर सोपान रमेश महाजन यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय कार्यकारिणीत २३ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून विविध गावांतील सक्रिय युवा कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीमुळे भडगाव तालुक्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, माजी आमदार दिलीप वाघ, महिला नेत्या वैशाली सूर्यवंशी, युवानेते अमोल शिंदे, प्रतापराव हरी पाटील, संजय वाघ, सोमनाथ पाटील, प्रशांत पवार, अनिल वाघ, सचिन चोरडिया, जितेंद्र पाटील, मुरलीधर भिल, प्रदीप सोमवंशी, किरण शिंपी, योगेश पाटील आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करून आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound