पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून याचा परिसरातील गरजू रूग्णांना लाभ होत आहे.
केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये सुरू झाली आहे. आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत २०११ च्या सर्वेक्षणानुसार राज्यातील ८३.७२ लाख कुटुंबांना पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचार झाले आहेत. यात बहुतांश विकारांवरील उपचारांचा समावेश आहे. पाचोरा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या योजनाची सुविधा करण्यात आली आहे.
बहुतांश जनतेला अत्यंत महागडे असे वैद्यकीय उपचार परवडत नाहीत. नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तर राज्य सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना अंमलात आणली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या दोन्ही योजना विघ्नहर्ता हॉस्पीटलमध्ये यशस्वीपणे सुरू असून याचा परिसरातील रूग्णांना लाभ होत आहे. शासनाच्या या सुविधांचा गरजू रूग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन विघ्नहर्ताचे संचालक डॉ. भूषण मगर-पाटील आणि डॉ. सागर गरूड यांनी केले आहे.