Home आरोग्य महादेव हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्यावरील आजारांवर विशेष उपचार शिबिर ; पात्र रुग्णांसाठी मोफत...

महादेव हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्यावरील आजारांवर विशेष उपचार शिबिर ; पात्र रुग्णांसाठी मोफत कॅशलेस शस्त्रक्रिया

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाठीच्या कण्याशी संबंधित गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी जळगावातील महादेव हॉस्पिटलने विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाठीच्या कण्यावरील विविध शस्त्रक्रिया कॅशलेस पद्धतीने करण्यात येणार असून, या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दर्जेदार उपचाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

महादेव हॉस्पिटलमध्ये पाठीच्या कण्याशी संबंधित विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, निदान आणि आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध आहेत. मणक्याचे झीजणे (स्पॉन्डिलायसिस), हर्निएटेड डिस्क (स्लिप डिस्क), चिमटलेली नस, स्पायनल स्टेनोसिस, स्कोलिओसिस (मणक्याची वक्रता) तसेच कंबरदुखी पायात पसरणे (सायटीका) यांसारख्या आजारांवर अनुभवी अस्थिरोग शल्यचिकित्सकांकडून उपचार केले जात आहेत. अचूक निदानासाठी एमआरआय तपासणी केवळ ४ हजार रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आजाराचे निदान होऊन योग्य उपचार सुरू करण्यास मदत होणार आहे. पाठीच्या कण्याच्या आजारांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. दीपक अग्रवाल, डॉ. नरेंद्र शिरसाठ, डॉ. प्रमोद सारकेलवाड आणि डॉ. विरेंद्र पाटील हे अनुभवी अस्थिरोग शल्यचिकित्सक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसह सेवा देत आहेत. आधुनिक ऑपरेशन थिएटर, प्रगत निदान यंत्रणा आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून रुग्णांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.

रुग्णालय प्रशासनाने पाठीच्या कण्याचा त्रास, सतत कंबरदुखी, पायात जाणारी वेदना, मानेचा त्रास किंवा हात-पाय बधिर होण्यासारखी लक्षणे जाणवत असल्यास उपचार पुढे न ढकलता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केले आहे. तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आर्थिक भाराशिवाय उपचार करून घ्यावेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे या सुविधेचा लाभ उपलब्ध असून अधिक माहितीसाठी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजना समन्वयक म्हणून डॉ. देवेंद्र पाटील मार्गदर्शन करणार आहेत.


Protected Content

Play sound