Home क्राईम चांदिवलीत संरक्षक भिंत कोसळल्याने 3 जण जखमी

चांदिवलीत संरक्षक भिंत कोसळल्याने 3 जण जखमी

0
103

Sakinaka Wall Collapse

मुंबई प्रतिनिधी । पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये आज दि.2 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्यामुळे दुपारच्या सुमारास चांदिवलीत म्हाडा इमारती समोरील चाळीतील घरावर संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.

चांदिवली परिसरातील म्हाडा इमारतीसमोरील चाळीवर आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखालून तिघांना बाहेर काढण्यात आलं. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. याआधी मालाडमधील पिंपरीपाडा येथे झोपड्यांवर भिंत कोसळल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला होता.


Protected Content

Play sound