Home Cities जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात छत्रपती शाहू महाराज व धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात छत्रपती शाहू महाराज व धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विनम्र अभिवादन केले.

शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणाच्या विचारांना तसेच धर्मवीर संभाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाला स्मरण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या महानगर अध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील, माजी महानगर अध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे महानगर अध्यक्ष एस. डी. पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, जळगाव शहर विधानसभा प्रमुख राजुभाऊ मोरे, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील भैय्या माळी आणि कार्यालय मंत्री सतीश चौव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श समाजाने कायम जपावा, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.


Protected Content

Play sound