Home Cities जळगाव शिवसेनेत सरपंच रविंद्र पाटील यांचा जाहीर प्रवेश

शिवसेनेत सरपंच रविंद्र पाटील यांचा जाहीर प्रवेश

0
12


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कुऱ्हा परिसरातील राजकीय घडामोडींना आज नवे वळण मिळाले असून हिवरा उंबरा गट ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र पाटील यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीने प्रेरित होऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते. पक्षप्रवेशावेळी वातावरणात उत्साहाचे वातावरण दिसून आले.

या प्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रविंद्र पाटील यांच्या प्रवेशाचे स्वागत करत पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. सरपंच रविंद्र पाटील यांच्या या निर्णयामुळे कुऱ्हा परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढणार असून स्थानिक पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

या कार्यक्रमात शिवसेना नेते विनोद तराळ, जिल्हा संघटक सुनिल पाटील, तालुका प्रमुख नवनीत पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख हितेश पाटील, उप तालुका प्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे, महेंद्र मोंढाळे, अमोल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नव्या प्रवेशित नेत्याचे स्वागत करत संघटन मजबुतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 


Protected Content

Play sound