Home Cities जळगाव बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 

बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्थेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 

0
71

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील बहिणाबाई ज्येष्ठ नागरिक महिला संस्था यांच्या वतीने रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्व. गोदावरी वासुदेव पाटील यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हे आरोग्य तपासणी शिबिर रविवार, २८ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चैतन्य नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ, कन्या शाळेजवळ येथे पार पडणार आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या शिबिरासाठी महादेव हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभणार असून, त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आरोग्य तपासण्या व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी यांसारख्या महत्त्वाच्या सेवा या शिबिरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. संस्थेच्या अध्यक्षा आशा तळेले व कार्यकारिणी मंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करून आपले आरोग्य जपावे, या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

परिसरातील ज्येष्ठ महिलांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. आरोग्यविषयक जनजागृती आणि प्राथमिक तपासणीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.


Protected Content

Play sound