
वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याविरोधात सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह आणि बदनामीकारक स्वरूपाचे फोटो प्रसारित करणाऱ्या संबंधित सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी वरणगाव शहरात समर्थकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी मोर्चेकऱ्यांनी वरणगाव पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक अमित बागुल यांना निवेदन सादर केले. सोशल मीडियावर काही व्यक्तींनी महिलांचे फोटो मॉर्फ करून त्यांचा गैरवापर करत मंत्री गिरीष महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले की, गिरीष महाजन यांची समाजातील प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियाचा गैरवापर करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे समाजात गैरसमज निर्माण होतात. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मोर्चात वरणगाव शहराध्यक्ष सुनील माळी, तालुकाध्यक्ष शामराव धनगर, जनसेवक मिलिंद भाईसे, जनसेवक कुंदन माळी, तेजस जैन, युवा अध्यक्ष आकाश निमकर, मुस्लिम भाई अन्सारी, रमेश मामा पालवे, फझल भाई, अजमल भाई, हितेश चौधरी, कमलाकर मराठे, राहुल वंजारी, गणेश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
याशिवाय ज्येष्ठ नेते बळीराम दादा सोनवणे, ज्येष्ठ नेते नामदेव दादा मोरे, पैलवान दत्तात्रय सूर्यवंशी, शालिग्राम पैसे, आयुब खान, निजाम मामू, दुर्गेश राजपूत, मयूर शेळके, जगन कोळी, साबीर कुरेशी, अरुण बावणे, छोटू सेवतकर, के. जी. अमृते, डॉ. सादिक शेख, पंकज नाना चौधरी, संदीप माळी, नदीम शेख, मुन्ना लपलीकर, राहुल जंजाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार बागुल यांनी मोर्चेकऱ्यांकडून निवेदन स्वीकारले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून सूत्रधाराचा शोध घेण्यात येईल आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास मंत्री गिरीष महाजन समर्थकांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोठ्या स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी यावेळी दिला.
मंत्री गिरीष महाजन यांच्या कथित बदनामीप्रकरणी वरणगाव शहरात काढण्यात आलेल्या मोर्चातून समर्थकांनी सोशल मीडिया गैरवापराविरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून, पोलिसांकडून तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.



