Home Cities भुसावळ वरणगावात भोगावती नदी स्वच्छता कामावरून वाद; माजी सरपंचांच्या आक्षेपानंतर काही काळ तणाव

वरणगावात भोगावती नदी स्वच्छता कामावरून वाद; माजी सरपंचांच्या आक्षेपानंतर काही काळ तणाव

0
62

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथे भोगावती नदीच्या स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामावरून वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. वरणगाव नगर परिषदेच्या वतीने नदी स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू असताना माजी सरपंच शेख सय्यद शेख भिकारी यांनी घटनास्थळी येऊन आक्षेप घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केल्यानंतर काम पुन्हा सुरू करण्यात आले.

वरणगाव शहरातील भोगावती नदीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने नगर परिषदेच्या माध्यमातून नदी स्वच्छता, खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील गाळ काढणे तसेच पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी हे काम वेगाने सुरू आहे.

दरम्यान, या कामाच्या ठिकाणी माजी सरपंच शेख सय्यद शेख भिकारी यांनी भेट देत काही आक्षेप घेतले. यावेळी त्यांच्यात आणि नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे. या वादामुळे काही काळ काम थांबवण्यात आले होते आणि घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर संबंधितांमध्ये समन्वय साधण्यात आला आणि नदी स्वच्छतेचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.


Protected Content

Play sound