Home राजकीय आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

0
25


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त साई मित्रपरिवार निंभोरा बु. यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देण्यात आला.

स्वर्गीय हरिभाऊ जावळे कृषी मित्र यांचे चिरंजीव तथा रावेर-यावल तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, युवक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वृक्षारोपण कार्यक्रमास कृषी विद्यालयाचे अध्यक्ष प्रल्हाद भाऊ बोंडे, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज सोनार, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष अनिल बऱ्हाटे, युवकांचे मार्गदर्शक डॉ. सुधाकर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी प्रगतशील शेतकरी गिरधर भंगाळे, रमेश येवले, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद भाऊ कोंडे, युवा कार्यकर्ते महेंद्र महाले, प्रगतशील शेतकरी राहुल भाऊ चौधरी, प्रभाकर सोनवणे, विजय भाऊ सोनार, पेंट हाऊसचे संचालक गजानन महाराज, राजूभाऊ महाले, सुनील भाऊ कोळंबे, रोशन बोंडे सर, अशोक काका बऱ्हाटे, योगेश बऱ्हाटे, प्रल्हाद सोनवणे, अविनाश सोनार, भय्यू सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.

वृक्षारोपण करताना उपस्थितांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनात वृक्ष लागवडीला महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. वाढत्या पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांची गरज असून, सामाजिक कार्यक्रमांना पर्यावरण संवर्धनाची जोड देणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

साई मित्रपरिवार निंभोरा बु. यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावात सकारात्मक संदेश पोहोचला असून, आमदार अमोल जावळे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून शुभेच्छा देण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला.


Protected Content

Play sound