Home राजकीय राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष गौरव वानखेडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !

राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष गौरव वानखेडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !

0
6


सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक शहराध्यक्ष गौरव वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. मुक्ताईनगर येथे आयोजित कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी गौरव वानखेडे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर व जनहिताच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांच्या प्रवेशामुळे सावदा शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रवेश सोहळ्यास शिवसेना शहराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक सूरज परदेशी, नगरसेवक श्यामभाऊ अकोले, निलेश खाचणे, राकेश बोराखडे, मनीष भंगाळे, सोहेल खान, मोईन खान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी गौरव वानखेडे यांचे स्वागत करताना त्यांच्या अनुभवाचा पक्षवाढीसाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

सावदा शहरातील युवकांमध्ये सक्रिय नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या गौरव वानखेडे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली असून आगामी काळात त्याचा राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound