Home Cities जळगाव आशीष सपकाळे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ प्रदान

आशीष सपकाळे यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ प्रदान

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । संविधान अमृत महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जळगावचे युवा सामाजिक कार्यकर्ते आशीष उत्तमराव सपकाळे यांना प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर झालेली दखल ही जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रसिद्ध विधितज्ज्ञ तथा आमदार सुधीर तांबे, डॉ. मुकुंद भरसकाके, संघराज रुपवते तसेच अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार, सामाजिक जनजागृती, विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत आशीष सपकाळे यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. समाजहिताच्या विविध विषयांवर त्यांनी केलेले कार्य आणि जनतेशी कायम ठेवलेला संवाद यामुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशीष सपकाळे यांनी हा सन्मान जळगाव जिल्ह्यातील नागरिक, सहकारी कार्यकर्ते आणि समाजहितासाठी कार्यरत असलेल्या सर्व घटकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही शिक्षण, जनजागृती आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवकांना नवी प्रेरणा मिळाली असून विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आशीष सपकाळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound