Home क्राईम चोपड्यात वाळू ठेकेदाराला झटका! तब्बल 4.93 कोटींची दंडात्मक नोटीस

चोपड्यात वाळू ठेकेदाराला झटका! तब्बल 4.93 कोटींची दंडात्मक नोटीस

0
29


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील मौजे तांदलवाडी (निमगव्हाण वाळू घाट) येथील मंजूर वाळू घाटाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी मे. चामुंडा सप्लायर्स अँड कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी प्रदीप युवराज गहाते यांना कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणात तब्बल 4 कोटी 93 लाख 52 हजार 827 रुपयांची दंडात्मक रक्कम आकारण्याचा प्रस्ताव असून, 24 तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Protected Content

Play sound