Home Cities जळगाव लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेहरूण येथे भावपूर्ण अभिवादन

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेहरूण येथे भावपूर्ण अभिवादन

0
13


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेहरूण येथे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन व पुण्यस्मरण कार्यक्रमात समाजबांधवांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. समस्त लाड वंजारी समाज, श्रीराम मंदिर संस्थान मेहरूण आणि वंजारी युवा संघटना, जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. गोपीनाथराव मुंडे चौक येथे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित वक्त्यांनी आपल्या मनोगतातून मुंडे साहेबांच्या सामाजिक, राजकीय आणि जनसेवेतील योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले संघर्षमय नेतृत्व आणि समाजहितासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

स्व. मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जनसामान्यांशी असलेली नाळ कायम जपली. समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, लोकाभिमुख नेतृत्व आणि संघटन कौशल्य यामुळे ते जनतेच्या मनात आजही अढळ स्थान राखून आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्याची गरज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमास समाजातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक-युवती तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजात एकता, शिक्षण आणि विकासाची मूल्ये रुजविण्यासाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी नामदेव वंजारी, प्रशांत नाईक, रामेश्वर पाटील, संतोष घुगे, अनिल घुगे, महादू सोनवणे, उमेश आंधळे, सुधीर नाईक, सुनील वंजारी, किशोर वाघ, अशोक लाडवंजारी, राजेंद्र घुगे पाटील, सोमनाथ पाटील, दिलीप लाडवंजारी, रमेश लाडवंजारी, अनिल चाटे, शिवाजी आंधळे, गणेश वाघ, प्रकाश घुगे, रवींद्र सानप, सुभाष घुगे, महेश घुगे, नंदू वंजारी, सुनील घुगे, गजानन झेड. पाटील, संजय घुगे, किशोर ढाकणे, दत्तात्रेय लाड, संजय देविदास पाटील, चेतन सानप, दिनेश घुगे, कल्पेश वाघ, आकाश सानप, अनिकेत वाघ, अशोक कोष्टी, हेमंत नाईक, प्रकाश कराड, संतोष चाटे, कृष्णा पाटील, गजानन वंजारी, सुरेश घुगे, शुभम घुगे, विजय देशमुख, संदीप पाटील, सुनील गांगळे आणि अतुल सानप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound