
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील जामनेर रोड भागातील रहिवासी आणि व्यावसायिक वकीली करणारे ५८ वर्षीय वकील अॅड. संजय व्ही. तेलगोटे यांची १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी जिमी जोसेफ (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्या विरोधात गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.

फसवणुकीची ही घटना १७ जुलै २०२५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भुसावळ येथे घडली होती. संशयित आरोपी जिमी जोसेफ याने फिर्यादी अॅड. संजय तेलगोटे यांचा विश्वास संपादन करून त्यांना तब्बल १० हजारांचा आर्थिक गंडा घातला. गुन्हा घडल्यानंतर प्रदीर्घ कालावधीने म्हणजेच २७ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजता सावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची रीतसर नोंद करण्यात आली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी जितेंद्र पाटील हे करीत आहे.



