
मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने कंटेंट क्रिएटर्ससाठी एक अत्यंत उपयुक्त आणि आकर्षक फीचर सुरू केले आहे. रिल्स तयार करणाऱ्या क्रिएटर्सना आता अॅपमध्येच ‘टेलीप्रॉम्प्टर’ची सुविधा मिळणार आहे. या नव्या फीचरमुळे व्हिडीओ शूट करताना मोबाईलच्या स्क्रीनवरच स्क्रिप्ट दिसणार असून, एकाच टेकमध्ये व्हिडीओ तयार करणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे एडिटिंगचा वेळ वाचणार असून, स्क्रिप्टमध्ये चूक होण्याची शक्यताही कमी होणार आहे.




