Home Cities जळगाव अशोकदादा शिंदे यांना शंभू गौरव पुरस्कार, आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण !

अशोकदादा शिंदे यांना शंभू गौरव पुरस्कार, आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोकदादा शिंदे यांना शंभू राज्याभिषेक ट्रस्ट आणि महाराष्ट्र विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शंभूगौरव पुरस्कार जाहीर झाला असून आज सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत याचे वितरण करण्यात येणार आहे.

अशोकदादा शिंदे यांनी सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अतिशय भरीव असे कार्य केले आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष असून रेड स्वस्तीक सोसायटी या मानवतावादी संघटनेचे महाव्यवस्थापक आहेत. त्यांच्या या भरीव कार्याची दखल घेऊन पुणे येथील शिवराज्यभिषेक ट्रस्ट आणि महाराष्ट्र विद्यार्थी सेना यांच्या वतीने त्यांना यंदाचा शंभूगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. आज दिनांक १७ मे रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजीत भव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला साहित्यीक विश्वास पाटील, अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण तरडे, इंदूर येथील होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर, पुणे येथील मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योतीताई मेटे, महाराष्ट्र किक बॉक्सींग संघटनेचे अध्यक्ष संतोष बारणे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशोकदादा शिंदे यांना शंभूगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून स्वागत करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound