नांद्रा येथील रस्ते चिखलमय ; वाहनचालक त्रस्त

nandra

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथे पाऊस संततधार सुरु आहे. त्यातच रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे रस्त्यावरील लाल चिकट मातीमुळे रस्ते चिखलमय झाले असून वाहने घसण्याच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, बसस्थानकावर सिमेंट रस्ता तयार होत. नाल्या व मोरीचे कामे तयार होत असल्याने पुरेसे सूचना फलक व रिफ्लेक्शन रेडियम न लावल्याने बाजुला तार लावले असल्याने वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. जळगाव ते पाचोरा या रस्तावर लाल चिकट माती टाकल्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणात चिखल तयार झाल्यामुळे मोटरसायकल स्लीप होण्याचे प्रमाण वाढले आहे. चार चाकी वाहने व गुरेढोरे यामुळे चालतांना प्रचंड त्रास होत आहे. नियोजन शून्य कारभारामुळे वाहन चालक व ग्रामस्थ बसस्थानक धारक व दुकानदार त्रस्त झाले आहेत. मनमर्जीप्रमाणे याठिकाणी यंत्रणाच्या साह्याने तार लावून मुख्यञिफुलीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. ते तार लावले आहेत पण ते वाहन चालकाना न दिसल्यामुळे डायरेक्ट तारांना धडकले जात आहेत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असून त्याठिकाणी रिफ्लेक्शन रेडियम व सूचना फलक लावणे गरजेचे आहे. या संबंधित विभागाने याठिकाणी संपूर्ण माती चिखल बाजूला सारून या ठिकाणी मुरूम टाकून तात्पुरता प्रमाणात रस्ता सुरळीत करण्याची मागणी त्रस्त झालेले वाहनचालकांकडून होत आहे.

Protected Content