Home Cities यावल दहिगावच्या आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल 71 टक्के 

दहिगावच्या आदर्श विद्यालयाचा दहावीचा निकाल 71 टक्के 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयाने यंदाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यालयाचा एकूण निकाल 71 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

आदर्श विद्यालयातून यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 80 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 53 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने समाधानकारक निकालाची नोंद केली आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये पाच विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. तसेच 24 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, 19 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर पाच विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणीत यश मिळविले आहे.

विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सोहम गिरीश महाजन याने 80.80 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रेरणा कैलास चौधरी हिने 77.80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तृतीय क्रमांकावर साक्षी महेश महाजन आणि गायत्री छोटू पाटील या दोन्ही विद्यार्थिनींनी 77.20 टक्के गुण मिळवत संयुक्तरीत्या स्थान मिळविले आहे. आकांक्षा दिलीप पाटील हिने 77 टक्के गुणांसह चौथा क्रमांक मिळविला असून ओम नितीन महाजन याने 74.60 टक्के गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकावला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जनता एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सुरेश देवराम पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक पी. बी. पाटील, पर्यवेक्षक एम. आर. महाजन आणि शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound