Home आरोग्य डॉ. महेश मांगुळकर यांची विघ्नहर्तामध्ये सेवा

डॉ. महेश मांगुळकर यांची विघ्नहर्तामध्ये सेवा

0
101

dr mahesh mangulkar पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये पोटांचे विकास तज्ज्ञ डॉ. महेश मांगुळकर यांची सेवा मिळणार असून ते पुढील रविवारी उपलब्ध राहणार आहेत.

डॉ. महेश मांगुळकर हे पोटांचे विकार आणि लिव्हरशी संबंधीत व्याधींचे तज्ज्ञ आहेत. ते एंडोस्कोपीच्या माध्यमातून निदान करण्यात आलेले आजार; इआरसीपी, अ‍ॅडव्हान्स एंडोस्कोपी थेरपी; कॅप्सुल एंडोस्कोपी, हायड्रोजन ब्रेथ टेस्ट; मॅनोमॅट्री व पीएच स्टडी; अल्सरेटीव्ह कोलायटीस; कावीळसह यकृताचे सर्व आजार व कर्करोग; अन्न नलिका व आतड्याचे आजार तसेच कर्करोग; स्वादुपिंडाच्या व्याधी आणि कर्करोग; पित्त व जळजळ होणे; काळी शौचास होणे आदी विकारांवर उपचार करतील. विशेष बाब म्हणजे ते यकृत प्रत्यारोपण म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ज्ञदेखील आहेत. डॉ. महेश मांगुळकर हे विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये पुढील रविवार म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी उपचारासाठी उपलब्ध राहणार आहेत. परिसरातील रूग्णांनी या सेवेचे लाभ घेण्याचे आवाहन विघ्नहर्ताचे संचालक डॉ. भूषण मगर-पाटील आणि डॉ. सागर गरूड यांनी केले आहे.


Protected Content

Play sound