यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक सकाळचे प्रतिनिधी डी. बी. पाटील यांच्यावर पत्नीवियोगाचे दु:ख कोसळले आहे. त्यांच्या पत्नी सौ. कुसुम दत्तात्रय पाटील (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात तसेच यावल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गंगानगर, यावल येथील रहिवासी असलेल्या सौ. कुसुम पाटील या प्रेमळ, मनमिळावू आणि कुटुंबवत्सल स्वभावामुळे परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती डी. बी. पाटील, मुलगा गौरव पाटील, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ३ वाजता गंगानगर येथील राहत्या घरून निघणार असून दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.




