Home क्राईम बसस्थानक परिसरातून महिलेचे दागिने लांबविले !

बसस्थानक परिसरातून महिलेचे दागिने लांबविले !


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर बसस्थानक परिसरात गुरुवारी भरदिवसा चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने एका महिला प्रवाशाच्या पिशवीतून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

माधुरी विलास पाटील (वय ३५, रा. जारगाव चौफुली, पाचोरा) या २३ एप्रिल रोजी जामनेर बसस्थानक परिसरात आल्या होत्या. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या उद्देशाने त्यांच्याकडील बॅगेतून हातसफाई केली. चोरट्याने ७० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची लांब पोथ, १० हजार रुपये किमतीची ४.५ ग्रॅम वजनाची छोटी सोन्याची पोथ आणि ९ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच फिर्यादी यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार रवींद्र देशमुख करत आहेत.


Protected Content

Play sound