चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे सालाबादाप्रमाणे वारकरी धर्माची मुहूर्त मेढ ज्यांनी रोवली, ज्यांचे अभंग शिखांच्या धर्मग्रंथ “गुरू ग्रंथसाहिब” मध्ये आहेत, असे श्री संत नामदेव महाराज यांच्या ६६९व्या संजिवन समाधी सोहळ्या निमित्त आज सकाळी फाडीतील विठ्ठल मंदिरापासून प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी युवानेते मंगेश चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
मिरवणुकीत मंगेशदादांनी युवकांसोबत बँडच्या तालावर ठेका धरून समाजबांधवांचा उत्साह वाढवला. या मिरवणुकीत युवा नेते मंगेश चव्हाण यांच्यासह, मा.पं.स.सदस्य सतीश पाटे, समाजाचे अध्यक्ष सुधाकर शिंपी, सर्व पदाधिकारी, समाजाचे माजी अध्यक्ष दिलीप कापडणे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, वनेश खैरनार, प्रमोद शिंपी, रुपेश पवार, गणेश निकुंभ व समाजातील बंधु-भगिनी उपस्थित होते.