भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावात मस्करीच्या कारणावरून एका तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी १९ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता समोर आली आहे. या घटनेत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावातील पुलाजवळ १९ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास सलीम चांदखाँ गवळी (वय ४९, रा. कन्हाळा) हे तिथून जात असताना त्यांचा आरोपींशी वाद झाला. यापुर्वी सलीम याने केलेल्या मस्करीचा रागातून संशयित आरोपी जावेद रहीम गवळी, अन्वर रेहमान गवळी, अक्तर रेहमान गवळी, मोसीन रहीम गवळी आणि रहीम गवळी सर्व रा. कन्हाळा ता. भुसावळ यांनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सलीम गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जावेद रहीम गवळी, अन्वर रेहमान गवळी, अक्तर रेहमान गवळी, मोसीन रहीम गवळी आणि रहीम गवळी सर्व रा. कन्हाळा ता. भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.




