धरणगाव प्रतिनिधी । येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये ‘माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र’ अभियानांतर्गत उद्धव ठाकरे वाढदिवसानिमित्त शिवसेनेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.टी. माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे होते. प्रमुख अतिथी भैयासाहेब सांळुखे, विजय पाटील, प्रभारी नगराध्यक्ष वासुभाऊ चौधरी, उपनगराध्यक्षा अंजलीताई भानुदास विसावे हे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भुषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाळेचे मुख्याध्यापक एस.आर. महाजन यांनी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन व प्रमुख अतिथी व म.न.पा.नगरसेवक व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते वहयांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी गरीब व होतकरू मुलांना २१ ड्रेस देण्याचे जाहीर केले. तसेच शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, पप्पु भावे (नगरसेवक), विलास महाजन (नगरसेवक), संजय चौधरी यांच्याकडून गरीब व होतकरू मुलांना प्रत्येकी २५ बुट देऊ असे जाहीर केले.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, माजी उपनगराध्यक्ष विजय महाजन, नगरसेवक बुटा भाऊ महाजन, चर्मकार महासंघ प्रदेशाध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक विलास महाजन, नगरसेवक भागवत चौधरी, नगरसेवक अजय चव्हाण, बालु जाधव, जितु धनगर, कमलेश बोरसे, गजानन महाजन, विनोद रोकडे, जयेश भाऊ महाजन, किरण अग्निहोत्री, राहुल रोकडे, नामदेव चौधरी हे मान्यवर पालक वर्ग, शिक्षक वृंद, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी.डी. पाटील व व्ही.टी. माळी तर आभार एस.व्ही.आढावे यांनी मानले.