Home क्राईम मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला

मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला

0
120

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या एमआयडीसी परिसरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर तलवारीने प्राणघातक वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन संशयितांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख इस्माईल शेख असगर (वय २५) यांचा मित्र अल्तमश आणि संशयित आरोपी यांच्या १८ एप्रिल रोजी रात्री ८.३० ते ९.०० च्या सुमारास अक्सा नगरातील शाळेजवळ काही कारणावरून वाद झाला होता. हे भांडण मिटवण्यासाठी फिर्यादी तिथे गेले असता, संशयित आरोपी शाहबाज ऊर्फ नगीना, तौसिफ पाशा ऊर्फ बिहारी आणि उजेर पिरजादा यांनी त्यांना गाठले.

यावेळी संशयित आरोपी शाहबाज याने शेख इस्माईलच्या कपाळावर तलवारीने गंभीर वार केला, तर तौसिफने लाकडी दांडक्याने आणि उजेर पिरजादा याने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. एवढेच नाही तर जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound