Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

जळगावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ; गुन्हा दाखल

0
108


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबबात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपासून पिडीत मुलगी ही अचानक बेपत्ता झाली. बराच वेळ शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने अखेर कुटुंबीयांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound