राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंना यश

boxing

भुसावळ प्रतिनिधी । महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनद्वारा राज्यस्तरीय स्पर्धा दि. २४ ते २८ जुलै आयोजित करण्यात आले असून, यादम्यान कॅडेट्स क्लास, कब क्लास, सब ज्‍युनियर व ज्‍युनियर महिला बॉक्सिंग स्पर्धा उरण जि. रायगड येथे घेण्यात आली.

या स्पर्धेत जळगाव जिल्‍हा बॉक्सिंग असोसिएशनतर्फे विविध वजणी गटात मुलींनी सहभाग घेतला होता. यात समीक्षा राहुल घोडेस्वारात सुवर्णपदक व बेस्ट बॉक्सर, संजना वीरू चंडाले, रजत पदक, निशा विसपुते कास्य पदक, नेहा करड़े हिने ही कास्य पदक, शिवानी साळवे कास्य पदक, तर ईश्वरी दुसाने, पौर्णिमा चौधरी, अश्विनी बाविस्कर, रक्षा लोधी आणि तेजस्वनी गवळी यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

संघाचे कोच म्‍हणुन मनोज सूर्यवंशी, संघव्यवस्थापक सुबोध गवळी, राहुल घोडेस्वार, चुन्नीलाल गुप्ता, सुनील नावगिरे, सूंदर बारसे, पवन सिरसाट, नाशिक विभाग बॉक्सिंग सचिव मिलिंद साळुंके, जळगाव जिल्‍हा बॉक्सिंग सचिव विजय सोनवणे, यावलचे पंकज तडवी आदींचे मार्गदर्शन यावेळी लाभले आहे. या यशाबद्दल दीपक (डी.के) शंकुपाडे मेघराज, तल्‍लारे, यशवंत चौधरी, अजय देवरे यांच्यासह जळगाव जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन, भुसावळ तालुका बॉक्सिंग असोसिएशन,
सम्राट बॉक्सिंग क्लब, कैशियस बॉक्सिंग अकॅडमी, एकलव्य स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे स्वागत करण्यात आले.

Protected Content