Home Cities एरंडोल अवैध गौण खनिज वाळूची तस्करी रोखली; मुद्देमाल जप्त

अवैध गौण खनिज वाळूची तस्करी रोखली; मुद्देमाल जप्त


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील पारोळा-एरंडोल रोडवरील कासोदा चौफुलीसमोर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गौण खनिज वाळूची वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. या कारवाईत सुमारे १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नथ्थू कोळी यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एका ट्रकद्वारे विनापरवाना वाळूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे ११ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कासोदा चौफुली येथे सापळा ट्रक (क्र. MH-20-GZ-4999) या पांढऱ्या रंगाच्या ट्रकची तपासणी केली.

तपासणी दरम्यान, ट्रकमध्ये ६ ब्रास गौण खनिज वाळू आढळून आली, ज्याची अंदाजे किंमत १ लाख ८० हजार रुपये आहे. या वाळू वाहतुकीसाठी चालकाकडे कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि १ लाख ८० हजार रुपयांची वाळू, असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी मच्छिंद्र गंगाधर वाघ (रा. राधास्वामी कॉलनी, संभाजीनगर) आणि शेख इरफान शेख अजिज (रा. हरसूल, संभाजीनगर) यांच्याविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला


Protected Content

Play sound