Home Cities जळगाव कुसुंबे खुर्दच्या तरुणांची गरुडझेप; बेरोजगारीवर मात करत शासकीय सेवेत मिळवले स्थान

कुसुंबे खुर्दच्या तरुणांची गरुडझेप; बेरोजगारीवर मात करत शासकीय सेवेत मिळवले स्थान


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते, हे जळगाव तालुक्यातील कुसुंबे खुर्द  येथील तरुणांनी सिद्ध करून दाखवले आहे. बेरोजगारीच्या संकटावर मात करत या गावातील अनेक तरुणांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून लिपिक, पोलीस भरती तसेच विविध शासकीय महामंडळांमध्ये कर्मचारी म्हणून निवड सार्थ ठरवली आहे. या तरुणांच्या यशामुळे कुसुंबे खुर्दची मान आज संपूर्ण राज्यात अभिमानाने उंचावली असून, गावाच्या इतिहासात एक सुवर्णपान जोडले गेले आहे.
या दैदिप्यमान यशाचे औचित्य साधून गावात सर्व नवनियुक्त सत्कारमूर्ती तरुणांचा त्यांच्या कुटुंबासह विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन माजी उपसरपंच प्रमोद घुगे आणि त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या सदस्यांनी केले होते. यावेळी शासकीय सेवेत भरती झालेल्या तरुणांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धा परीक्षेतील संघर्षाचा प्रवास उपस्थितांसमोर मांडला, जो इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
आभार अध्यक्ष निर्मल पाटील यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महेश पाटील, बबलु पाटील, कैलास फेगडे, योगेश फेगडे, महेश महाजन, गणेश मिस्तरी, कृष्णा सोनवणे, चंदू पाटील, चेतन पाटील, भावेश पाटील, अक्षय राजपूत, राजेश्वर चिंचोले आणि खुशाल अहिरे यांच्यासह त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या कौतुक सोहळ्यामुळे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून या तरुणांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


Protected Content

Play sound