Home राजकीय फैजपूर पालिकेच्या विषय समिती सभापतीपदींची बिनविरोध निवड

फैजपूर पालिकेच्या विषय समिती सभापतीपदींची बिनविरोध निवड

0
129

फैजपूर- फैजपूर पालिकेच्या विषय समिती सभापतीपदींची निवड बिनविरोध करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी तथा जामनेर तहसीलदार नामदेव टिळेकर होते. या बैठकीत स्वच्छता व वैद्यकीय आरोग्य समिती सभापतीपदी नयना चंद्रशेखर चौधरी, सर्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी साहिमाबी मलक आबिद, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी फातेमा बानो रईस मोमीन, नियोजन व विकास समिती सभापतीपदी अमोल किशोर निंबाळे, स्थायी समिती सभापतीपदी- नगराध्यक्ष महानंदा टेकाम, तर सदस्यपदी कलीम मणियार, नयन चौधरी, साईमा बी मलक आबिद, फातेमा बानो रईस मोमीन, अमोल किशोर निंबाले यांची निवड करण्यात आली.

याप्रसंग भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे वगळता सर्व नगरसेवक उपस्थित होते. मुख्याधिकारी किशोर चव्हाण नगराध्यक्षा महानंदा टेकाम यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते शेख कुर्बान, नगरसेवक हेमराज चौधरी, प्रभाकर सपकाळे, अमिता चौधरी, शकुंतला भारंबे, देवेंद्र साळी,देवेंद्र बेंडाळे, वत्सला कुंभार, शाहीन परवीन शकील खान, रशीद तडवी, पुष्पा कापडे, डॉ इमरान अब्दुल रउफ, नफीसा बानो शेख इमरान यांची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound