जळगाव: भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या विशेष दिनाचे औचित्य साधून आमदार राजूमामा भोळे आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये माजी नगरसेवक अण्णासाहेब भापसे यांचे सुपुत्र चंद्रकांत भापसे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृतपणे प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर विशालजी त्रिपाठी, कार्यालय मंत्री उदयजी भालेराव, नगरसेवक अजितभाऊ राणे, राहुलभाऊ पाटील, नीलूआबा तायडे, मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे, राजू मराठे आणि अरुण श्रीखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत भापसे यांचा पक्षप्रवेश भाजप महानगर जिल्हा चिटणीस विठ्ठलभाऊ पाटील आणि भाजप महानगर अल्पसंख्याक आघाडीचे गुड्डूभाऊ पठाण यांच्या पुढाकाराने पार पडला.

या सोहळ्याप्रसंगी शक्तीकेंद्र प्रमुख संजूभाऊ कोळी, बूथ प्रमुख पंकज सोनवणे यांच्यासह भाजप जळगाव महानगरचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जळगावात भाजपची ताकद आणखी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार राजूमामा भोळे यांनी यावेळी नवीन सदस्यांचे स्वागत करत पक्षाच्या ध्येयधोरणांनुसार जनसेवेचा संकल्प व्यक्त केला.



