Home आरोग्य जळगाव महानगरपालिकेतर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा

जळगाव महानगरपालिकेतर्फे जागतिक आरोग्य दिन साजरा

जळगाव-, लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । “आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने आपली दिनचर्या उत्तम ठेवली पाहिजे. तसेच विविध लसीकरण वेळेवर करून घेणे गरजेचे आहे. शेवटी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे,” असे प्रतिपादन महापौर दीपमाला काळे यांनी केले. जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागाच्या वतीने मंगळवार, ७ एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त’ राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. व्यासपीठावर उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधु कोल्हे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, स्थानिक नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, अर्शिनबानो खाटीक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ उपस्थित होते.

डॉ. वैभव वारके यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मनोगत व्यक्त करताना नागरिकांनी दैनंदिन जीवनात आरोग्याप्रती अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. कमलेश अमोदकर यांनी केले, तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी आभार मानले. याप्रसंगी दवाखाना विभागातील विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जळगाव: “आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येकाने आपली दिनचर्या उत्तम ठेवली पाहिजे. तसेच विविध लसीकरण वेळेवर करून घेणे गरजेचे आहे. शेवटी आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे,” असे प्रतिपादन महापौर दीपमाला काळे यांनी केले. जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागाच्या वतीने मंगळवार, ७ एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त’ राजर्षी शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाला शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. व्यासपीठावर उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधु कोल्हे, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, स्थानिक नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, अर्शिनबानो खाटीक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. वैभव वारके यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना नागरिकांनी दैनंदिन जीवनात आरोग्याप्रती अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. कमलेश अमोदकर यांनी केले, तर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी आभार मानले. याप्रसंगी दवाखाना विभागातील विविध वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि जळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content

Play sound