Home आरोग्य गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण – प्राचार्य व्ही.एच. पाटील

गरजूंना मदतीचा हात हीच स्व. गोदावरी आजींची शिकवण – प्राचार्य व्ही.एच. पाटील


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवारी (१ एप्रिल) स्व. गोदावरी आजींच्या जयंतीनिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमादरम्यान आजींच्या संघर्षमय जीवनाचा आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला गेला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून आजींच्या उभारलेल्या कार्याचे स्मरण करून उपस्थितांना भावनिक संदेश दिला. त्यांनी सांगितले की, गरजू व्यक्तींना मदत करणे हीच आजींची खरी शिकवण असून ती प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारावी.

कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी आजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांनी गोदावरी आजींच्या कठीण परिस्थितीतून सामाजिक व शैक्षणिक कार्य उभारण्याची प्रेरक कथा सांगितली.

डॉ. सरोज भोळे यांनी आजींच्या विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या कष्टाळूपणा, चिकाटी आणि दूरदृष्टीमुळेच संस्था उंच शिखरावर पोहोचली असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. प्रवीण सोनवणे यांनी गोदावरी फाऊंडेशनच्या व्यापक कार्याची माहिती देत समाजातील त्यांच्या प्रभावावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी गोदावरी आजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील उपस्थित होते. गोदावरी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स महाविद्यालय, गोदावरी इंग्लिश स्कूल, डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, होमीओपॅथीक महाविद्यालय व रूग्णालय, आयुर्वेदीक महाविद्यालय व रूग्णालय, फिजिओथेरेपी महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच संगीत महाविद्यालयातही या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


Protected Content

Play sound