Home Cities भुसावळ पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक 

पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक 


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दैनिक पुढारीचे पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक झाला असून त्यांचे वडील कैलास सिंग काशीराम पाटील (वय 80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कैलास पाटील यांचे 31 मार्च रोजी दुपारी 3.55 वाजता निधन झाले. ते गेल्या काही काळापासून वयोमानानुसार आजारांनी त्रस्त होते. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, दोन जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. कैलास पाटील हे साध्या, मनमिळावू स्वभावामुळे परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने समाजातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, त्यांची अंत्ययात्रा 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता खडका रोड, नेमाडे कॉलनी, भुसावळ येथून निघणार आहे.


Protected Content

Play sound