Home क्राईम दुचाकी घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू !

दुचाकी घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू !


वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहराकडून मुक्ताईनगरकडे परतत असताना रत्यावरील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात ३२ वर्षीय महिला व्यवसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिपाली सुधाकर गवते (रा. माळेगाव, पो. निमखेडी खुर्द, ता. मुक्ताईनगर) असे मृत महिलेचे नाव असून, त्या एल.आय.सी. एजंट म्हणून कार्यरत होत्या. वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिपाली गवते या ४ मार्च रोजी भुसावळ येथून वरणगावमार्गे आपल्या गावी परतत होत्या. वरणगाव शहरापासून जवळ मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांची ॲक्टिव्हा स्कुटी (एमएच १९ ईटी ४६२२) अचानक घसरली. रस्त्याला असलेल्या खड्ड्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या अपघातात त्यांच्या तोंडाला आणि छातीला गंभीर मार लागला होता.

अपघातानंतर त्यांना तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे गेल्या काही दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound