Home क्राईम भरधाव दुचाकीने उडविले, वृध्दाचा मृत्यू; ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल

भरधाव दुचाकीने उडविले, वृध्दाचा मृत्यू; ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील शिंदी ते मानमोडी रोडवर भरधाव दुचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत किसन श्रीपत धुलकर वय ५८ याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च रोजी घडली आहे. याबाबत बुधवारी २५ मार्च रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किसन धुलकर (रा. मानमोडी, ता. बोदवड) हे काही कामानिमित्त शिंदी गावी गेले होते. २४ मार्च रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास आपले काम आटोपून ते शिंदी येथून मानमोडीकडे परतत होते. दरम्यान, शिंदी ते मानमोडी रोडवर समोरून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकीने धुलकर यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात किसन धुलकर हे गंभीररित्या जखमी झाले. त्यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे नातू अनिल जगलू भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास बाविस्कर हे करीत आहे.


Protected Content

Play sound