पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने येथील शिवनगर भागातील ८० जणांना मोफत इलेक्ट्रॉनिक मीटर व कनेक्शन शासकिय योजनेतून मंजूर करण्यात आले आहे. यामुळे सामान्य नागरिकांचा विजेचा प्रश्न मिटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
या प्रश्नी नागरिकांनी मोर्चा काढला होता. शिवनगर भागात मोठ्याप्रमाणावर वीज चोरी होत आहे. याकरणाने वारंवार रोहित्र जळत असल्याने वीज पुरवठा खंडित होत असे. या सततच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाल्याने महावितरणने केबल टाकण्यासाठी काम हाती घेतले आहे. काही नागरिकांनी केबल टाकण्यास विरोध दाखविला. मात्र वीज चोरी रोखण्यासाठी केबलचे काम पूर्ण केले जाणार आहे. याकरणाने वीज पुरवठा खंडित होत आहे. या त्रासाला कंटाळून येथील काही नागरिकांनी पहूर पेठ ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला होता. हा रोष महावितरणच्या विरोधात असतांना ग्रामपंचायत वर मोर्चा कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान केबल टाकण्याच्या मोहीमेमुळे अवैध वीज कनेक्शनधारकांचे धाबे दणाणले. अधिकृत वीज जोडणी साठी नागरिकांनी वीजमहावितरण कडून वेळ घेतला आहे. याची दखल घेऊन ग्रामपंचायत पेठ ने मोफत वीज कनेकशन उपलब्ध करून दिल्याने विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र शिवनगर वासीयांनी मोठ्या वीज चोरांविरूध्द महावितरणने कडक कारवाई ची मागणी केली आहे.
दोन दिवसात मीटर
दरम्यान दोन दिवसात मीटर वितरीत केली जाणार असल्याचे सरपंच निताताई रामेश्वर पाटील यांनी सांगितले आहे. वीज जोडणी साठी लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी तिरुपती भारत गँस एजन्सी चे संचालक तथा सेंट्रल रेल्वे बोर्डाचे सदस्य रामेश्वर पाटील, भाजपा तालुका अल्प संख्याक अध्यक्ष सलीम शेख गणी, संदीप बेढे, भारत पाटील, ईश्वर देशमुख, प्रकाश पाटील, यांच्या सह लाईनमन उपस्थित होते.