Home Cities अमळनेर भरधाव क्रेनने सायकलस्वाराला उडवले ; वृद्धाचा जागीच मृत्यू !

भरधाव क्रेनने सायकलस्वाराला उडवले ; वृद्धाचा जागीच मृत्यू !


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अमळनेर शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील एका ७२ वर्षीय वृद्धाचा भरधाव क्रेनने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमळनेर ते चोपडा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जयरामदास दर्यानोबल धर्मांनी (वय ७२, रा. सिंधी कॉलनी, अमळनेर) हे बुधवारी, २४ मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास आपल्या सायकलने चोपडा रोडवरून जात होते. ते गजानन महाराज मंदिराजवळून सिंधी कॉलनीकडे येत असताना, अमळनेरकडून चोपडाकडे जाणाऱ्या (एमएच १९ सीव्ही १६७७) या क्रमांकाच्या क्रेनने त्यांना जोराची धडक दिली.
या अपघातात जयरामदास धर्मांनी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या क्रेनवरील चालकाने वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ गणेश पाटील करत आहेत.

 


Protected Content

Play sound